डियर long distance लव्ह ♥️
डिअर long distance लव्ह ... सुरवात long distance वाली आहे म्हंटल्या वर पुढे बरंच काहीतरी इंटरेस्टींग वाचायला मिळणार एवढं नक्की ! आधी कामामुळे आता या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सगळंच जग दुरावल गेलंय ना , आधी कधीतरी वेळ काढून ऑफिस आधी भेटणं व्हायचं , चहाच्या टपरीवर झटपट सिगरेट सोबत गप्पा व्हायचा आता कसलं काय सगळंच राहिलंय.अरे त्यात आपण दोन टोकावर राहणारी माणस आहोत त्यामुळे तू काही मला भेटायला येत नसतोस आणि आला तरी ते येऊन पटकन भेटून जाणं वगैरे प्रकार आपल्याला मुळीच पटत नाही पण खरं सांगू अगदीच लॉक डाऊन आधी आपण छान पार्टी केली अर्थात busy शेड्युल मधून तू वेळ काढून आला होतास पण आता सुद्धा कधीतरी अचानक दारावरची बेल वाजावी आणि घराबाहेर तू उभा हवा हे असलं काहीतरी व्हावं असं मला वारंवार वाटत राहतं पण मग पुन्हा मनाची समजूत घालून अरे ठीक हे सगळं संपलं की निवांत भेटू असं म्हणून विषय तिथेच बंद करून सोडून द्यायचा. हल्ली मी फार वेगळी वागते असं आजच बोलला तू पण माझी तुझ्यावर अतिशय जास्त होणारी चिडचिड मला सहन नाही होत शब्दाला शब्द लागतात आणि मग भांडण होतात हे मला आवडत नाही ...