Posts

Showing posts from May, 2020

स्पर्श

    " स्पर्श " या शब्दात किती गंमत आहे ना ! कदाचित लॉकडाऊन मुळे या शब्दांची खरी किंमत  माझ्या सारख्या अनेकांना उमजली असेन. स्पर्श हा वेगवेगळा असतो मग तो कोणीतरी मायने केलेला हळुवार स्पर्श असो किंवा कित्येकदा प्रवासात गर्दीत झालेला कोणीतरी मुद्दाम केलेला  नकोसा असा स्पर्श असो. या शब्दांची व्याख्या परिस्थिती नुसार बदलत जाते. आता लॉकडाऊन आणि या कोरोनाच्या काळात साधं आपल्या जवळच्या व्यक्तीला  देखील स्पर्श करण्याची भीती वाटते कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण मग यात हा " स्पर्श " कुठेतरी हरवत चालला का ! या निमित्ताने का होईना स्पर्शाची किंमत कळली. मी शेवटचं कोणाला घट्ट मिठी मारल्याचं मला आठवत नाही , त्याने तिने शेवटचं कधी किस केलं हे आठवत नाही तर आपल्या त्या जिगरी व्यक्तीने आपल्याला प्रमाने कधी जवळ घेऊन कुरवाळलेल हे आठवत नाही. स्पर्श हा अनेकदा हवाहवासा वाटतो कारण तो आपल्याला हव असतो आपल्याला जशी अन्न वस्त्र निवारा यांची गरज असते तशीच आपल्याला " human touch मानवी स्पर्शाची " गरज असते. ऑफिस मधून  थकून भागून आल्यावर आईने डोक्यावरून फिरवलेला हात असू देत किंवा ब...

बकेटलिस्ट

बकेटलिस्ट        आपल्या प्रत्येकाची अशी एक बकेटलिस्ट नक्कीच असते ही बकेटलिस्ट खूप साऱ्या स्वप्नांनी बहरलेली असते. या बकेटलिस्ट मध्ये खूप स्वप्न ,  इच्छा असतात किती पूर्ण होतात माहीत नाही पण बकेटलिस्ट मधली प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हावी अशी काही अट नसते. पूर्ण झाली तर उत्तम नाही तर नव्या स्वप्नांनी इच्छानी ही बकेटलिस्ट पुन्हा भरते.आजची बकेटलिस्ट काहीशी खास आहे कारण ही बकेटलिस्ट  तिच्या एकटीची नसून तिच्या त्या आवडत्या जवळच्या खास व्यक्तींची अशी या दोघांची एक कॉमन " बकेटलिस्ट " आहे!  अरे हो असं कुठे लिहिलंय बकेटलिस्ट एकाच व्यक्तीची असावी काही स्वप्न सोबत पाहिलेली असतात , काही प्लॅन्स हे सोबत करायचे असतात त्या गोष्टी तलं ते थ्रिल त्यांना सोबत अनुभवायचं असतं म्हणून ही एकच पण बेस्ट अशी बकेटलिस्ट ! अनया  आणि कबीर  यांची ही एक कॉमन बकेटलिस्ट जरी असली तरी दोघांना आयुष्यात खूप वेगळ्या गोष्टी अनुभवायचा आहेत , दोघांची स्वप्न एकमेकांच्या सोबतीने पुर्ण करायची आहेत. मग त्यांच्या या कॉमन बकेटलिस्ट मध्ये खूप गोष्टीचा खजिना आहे , थ्रिल आहे , गंमत ...

" चिल्ल बियर ते कडक चहा "

Image
किती गंमत असते ना काही नात्यामध्ये त्यात जर तुमचं नात हे अनपेक्षित पणे घडलं असेन किंवा एखादी व्यक्ती आयुष्यात अनपेक्षित पणे येते आणि पुढे आयुष्यभरासाठी आपल्या आयुष्याच्या  प्रवासाचा एक भाग होऊन जाते. निशांत  हा इन्स्टाग्राम वर भेटला असला तरी आज सुद्धा तिला हे ठळक आठवतंय की तिच्या २१ व्या वाढदिवसाला मॅडम बार मध्ये एकट्या birthday सेलिब्रेशन करत असताना व्हर्च्युअली तो तिच्या त्या खास दिवसाचा एक भाग होता आणि नेमकं त्याचं दिवशी यांचे नंबर exchnage झाले! किती योगायोग असावा ना इथून यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. असं म्हणतात जी लोक आपल्याला अनपेक्षित अचानक भेटतात ती फार खास असतात " निशांत  " सुद्धा तिच्या साठी तेवढाच खास आहे. डिजिटली गप्पा नंतर त्यांना भेटण्याची एक अनोखी ओढ लागली सगळंच एवढं unexpected  घडत असताना त्यांची " पहिली वहिली " भेट देखील तितकीच कमाल होती. त्यांचा ऑफिस खालच्या टपरीवर मस्त चहा घेत पहिल्या भेटीला चियर्स म्हणत त्यांच्या हातातल्या सिगरेट च्या धुरात ती कुठे तरी एवढी रमली की तिला कळलं नाही आपला चहा तर केव्हाच संपला. आजूबाजूला कॅफे नसल्याने ही " टपरी...

प्रवास

आजच्या भेटी मध्ये  त्या फॉर्मल भेटीगाठीचा फील जास्त होता म्हणून कदाचित दोघांनी एकमेकांना फार फॉर्मली चल निघतो असं म्हणून दोघे आपल्या प्रवासाला निघाले.प्रवासाच्या वाटा भिन्न होते. आधी एकमेकांच्या भेटीत गंमत होती , कॉफी नंतर त्या बँडस्टँड वर तासनतास गप्पा रंगायचा. आज फक्त कॉफी घेऊन सो कॉल्ड आयुष्यावर गप्पा मारून दोघे आपल्या वाटेवरून निघाले होते. दोघांनी एकमेकांचा निरोप घेऊन निघाले खरे पण पुन्हा मनात त्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. अरे हा किती बदलला आहे याची किंचित जाणीव झाली , परिस्थिती बदलते तसे आपण सुद्धा काळाच्या प्रवाहात वाहत जातो आणि काळानुसार बदलतो. दोघांच्या मनात पुन्हा त्याच जुने दिवसांनी कॉफीच्या गप्पांनी हँग आऊट करायला सुरुवात केली. अनया आणि कबीर दोघे दोन दिशांना राहायचे त्यामुळे सोबत जाण्याचा काही चान्स नव्हता आणि एवढ्या वर्षांनी भेटून चल मी सोडतो वैगरे अशी मनात कल्पना आली तरी ती कल्पना तिथेच छान दिसते म्हणून दोघे आपल्या दोन दिशांनी निघून गेले. आपली  भेट होईन का ? कबीर परदेशांत गेलाच नाही तर  ? अश्या अनेक प्रश्नांनी एव्हाना  अनयांच्या मनात गर्दी करायला सु...

" कबीर आणि कॉफी "

टेबलाजवळ जाताच त्याला तिच्या येण्याची चाहूल आधीच लागली असते तरीही आपल्याला काही माहीत नाही अश्या mode मध्ये तिने टेबलाजवळ जाऊन hiiii कबीर अशी हाक मारली. कबीराला तिच्या येण्याची हलकेच चाहूल लागून सुद्धा त्याने काही react न करता आताच्या hii ला मस्त पैकी " अरे आली तू बस ना " असं म्हणून तिला बसण्यासाठी खुर्ची पुढे केली. नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त केस मस्त जॅकेट अश्या अवतारात तो आला होता hii heloo या फॉर्मली स्वागता नंतर त्यांनी कॉफी ऑर्डर केली. इथली कॉफी आज सुद्धा  तशीच आहे अगदी कबीरच्या स्वभावासारखीच. कबीर फार काही बदलला नव्हता कॉफी येई पर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा हे चालू होतं. एकदाची दोघांची " खास " आवडती कॉफी आली. कॉफीचा पहिला सिप  घेऊन इथली कॉफी अगदी तशीच आहे ना गं ! असं कबीर म्हणून गेला. कॉफीच्या सोबतीने गप्पा रंगत गेल्या , जुन्या आठवणी , जुने किस्से कॉफीचा माहोल सगळं किती आधी सारखं आहे असं अनया ला वाटून गेलं. आता कुठे गप्पा रंगल्या असताना दोघे कुठेतरी टॉक्सिक गप्पा मारत मारत लग्न वैगरे या विषयावर येऊन पोहचले. अनया ने ती live in मध्ये राहते असं मनमोकळे पणे सांगून ट...

" भेटीची ओढ "

कधी एकदाचे सात वाजतात असं झालंय ! रोज कधी काम संपवून घरी जाते अश्या अवस्थेत असणारी अनया आज मात्र एकदम वेगळ्या मूड मध्ये होती. एकदाचे ६ वाजले ऑफिस मधली कॉफी न घेता मॅडम पटापट ऑफिस च्या पायऱ्या उतरून " त्या " खास कॉफी शॉप कडे रवाना झाल्या. रस्त्यात गौरांग ला फोन करून आज थोडं लेट होईन असं सांगून कॅब मध्ये बसलेल्या अनया च्या मनात विचारांच चक्र फिरायला लागलं. मस्त संध्याकाळ आणि बांद्रा च्या बँडस्टँड जवळ असलेलं त्यांचं खास असं कॉफी शॉप. अनया आज खूप वर्षांनी या कॉफी शॉप मध्ये जाणार होती , कॅब मध्ये असताना हजार वेळा काही नवीन msg आला का हे ती चेक करत होती. एवढ्या वर्षांनी ही भेट पुन्हा एकदा होणार होती , काळ लोटला होता गोष्टी खूप बदलल्या होत्या पण " तो " बदलला असेन का ! या प्रश्नाचं उत्तर आज तिला त्याला भेटुन कळणार होत. छान  संध्याकाळ होती मस्त सूर्योस्त  होत होता आणि एकीकडे मनात वेगळंच काहीतरी सुरू असताना कधी गाडी येऊन कॉफी शॉप समोर थांबली हे तिला कळलं नाही. कॅब मधून बाहेर पडत चाचपडत अनया ने कॅफे च दार उघडलं तो त्याच खास जागी बसला होता जिथे हे अगोदर कायम बसायचे. आज खूप वर्ष...

कॉफी आणि बरंच काही ...

कॉफी आणि बरंच काही ...     सकाळी ऑफिस ची गडबड आणि त्यात दिवसभराच्या मीटिंग  आणि मग घाईघाईने घेतलेली ती " कॉफी " चल अगं पटकन कॅब गेटवर आली हे ऐकताच कॉफीच्या मगमधून बाहेर येत मॅडम भानावर येतात आणि बॅग घेऊन रोजच्या रुटीन साठी घराबाहेर पडतात. रोज कॅब मध्ये त्याच गप्पा ऐकून बोर व्हायचं म्हणून हल्ली ऑफिस येईपर्यंत पुस्तक वाचत ऑफिस पर्यन्त चा प्रवास सुखकर व्हायचा! चल ऑफिस आलंय उतर संध्याकाळी पुन्हा भेटू असा tata bye bye करत ऑफिसच्या गेटवर पोहचून अनया ऑफिस मध्ये पोहचली. काम lienup करून कामाला सुरुवात झाली आणि मग दिवसभराची काम करायला प्रारंभ केला. दिवसभर मित्र मैत्रिणी चे msg गौरांग चे कॉल्स हे सगळ्यात करण्यात दिवस जातो मग अचानक फोन वर एक txt msg येऊन आदळतो ! " कॉफी ला भेटू या ? " ती थोडी संभ्रमात पडते नंबर unknown असल्यामुळे तिने पटकन numbr true कॉलर चेक केला ! गौरांग तर नेहमीप्रमाणे जाताना आपल्याला पीक करतो पण आज हा msg कोणाचा ! भविष्यात एवढे busy असतो की काही जुन्या आठवणी achanak पॉप up होतात आणि मग त्या कॉफी msg चा उलगडा होतो. Txt msg " त्या " खास व्यक्तीचा असत...