कॉफी आणि बरंच काही ...
कॉफी आणि बरंच काही ...
सकाळी ऑफिस ची गडबड आणि त्यात दिवसभराच्या मीटिंग आणि मग घाईघाईने घेतलेली ती " कॉफी " चल अगं पटकन कॅब गेटवर आली हे ऐकताच कॉफीच्या मगमधून बाहेर येत मॅडम भानावर येतात आणि बॅग घेऊन रोजच्या रुटीन साठी घराबाहेर पडतात. रोज कॅब मध्ये त्याच गप्पा ऐकून बोर व्हायचं म्हणून हल्ली ऑफिस येईपर्यंत पुस्तक वाचत ऑफिस पर्यन्त चा प्रवास सुखकर व्हायचा! चल ऑफिस आलंय उतर संध्याकाळी पुन्हा भेटू असा tata bye bye करत ऑफिसच्या गेटवर पोहचून अनया ऑफिस मध्ये पोहचली. काम lienup करून कामाला सुरुवात झाली आणि मग दिवसभराची काम करायला प्रारंभ केला. दिवसभर मित्र मैत्रिणी चे msg गौरांग चे कॉल्स हे सगळ्यात करण्यात दिवस जातो मग अचानक फोन वर एक txt msg येऊन आदळतो ! " कॉफी ला भेटू या ? " ती थोडी संभ्रमात पडते नंबर unknown असल्यामुळे तिने पटकन numbr true कॉलर चेक केला ! गौरांग तर नेहमीप्रमाणे जाताना आपल्याला पीक करतो पण आज हा msg कोणाचा ! भविष्यात एवढे busy असतो की काही जुन्या आठवणी achanak पॉप up होतात आणि मग त्या कॉफी msg चा उलगडा होतो. Txt msg " त्या " खास व्यक्तीचा असतो पण मग जावं की नाही हे कळत नाही शेवटी खूप दिवसांच्या rather खूप वर्षा पासून पेंडिंग भेटी गाठी गप्पा आणि जुन्या आठवणी चा फ्लॅशबॅक कॉफी सोबत नक्कीच घडू शकतो याचा अनया ला अंदाज होता. तिने सुद्धा त्या msg ला रिप्लाय देत येस ७ pm at same place हा txt msg टाकत समोरच्या त्या खास व्यक्तीला खुश केलं! खूप वर्षांनी होणारी हे भेट नक्कीच अनेक जुन्या गोष्टी उकरून काढणार होती यांचा पूर्ण अंदाज असताना देखील तोच जुना कॉफी टेबल , कॉफी प्लेस त्याच जुन्या आठवणी ….
Comments
Post a Comment