" भेटीची ओढ "
कधी एकदाचे सात वाजतात असं झालंय ! रोज कधी काम संपवून घरी जाते अश्या अवस्थेत असणारी अनया आज मात्र एकदम वेगळ्या मूड मध्ये होती. एकदाचे ६ वाजले ऑफिस मधली कॉफी न घेता मॅडम पटापट ऑफिस च्या पायऱ्या उतरून " त्या " खास कॉफी शॉप कडे रवाना झाल्या. रस्त्यात गौरांग ला फोन करून आज थोडं लेट होईन असं सांगून कॅब मध्ये बसलेल्या अनया च्या मनात विचारांच चक्र फिरायला लागलं. मस्त संध्याकाळ आणि बांद्रा च्या बँडस्टँड जवळ असलेलं त्यांचं खास असं कॉफी शॉप. अनया आज खूप वर्षांनी या कॉफी शॉप मध्ये जाणार होती , कॅब मध्ये असताना हजार वेळा काही नवीन msg आला का हे ती चेक करत होती. एवढ्या वर्षांनी ही भेट पुन्हा एकदा होणार होती , काळ लोटला होता गोष्टी खूप बदलल्या होत्या पण " तो " बदलला असेन का ! या प्रश्नाचं उत्तर आज तिला त्याला भेटुन कळणार होत. छान संध्याकाळ होती मस्त सूर्योस्त होत होता आणि एकीकडे मनात वेगळंच काहीतरी सुरू असताना कधी गाडी येऊन कॉफी शॉप समोर थांबली हे तिला कळलं नाही. कॅब मधून बाहेर पडत चाचपडत अनया ने कॅफे च दार उघडलं तो त्याच खास जागी बसला होता जिथे हे अगोदर कायम बसायचे. आज खूप वर्षांनी पुन्हा अनया जुन्या दिवसात रमली , जुन्या आठवणी जागवत नव्याने ती त्याला अनुभवणार होती. तो नेहमी प्रमाणे हिची वाट बघत त्याच टेबलावर बसला होता ! अनया वेळेचा विलंब न करता टेबलाजवळ गेली आणि ....
Comments
Post a Comment