" कबीर आणि कॉफी "
टेबलाजवळ जाताच त्याला तिच्या येण्याची चाहूल आधीच लागली असते तरीही आपल्याला काही माहीत नाही अश्या mode मध्ये तिने टेबलाजवळ जाऊन hiiii कबीर अशी हाक मारली. कबीराला तिच्या येण्याची हलकेच चाहूल लागून सुद्धा त्याने काही react न करता आताच्या hii ला मस्त पैकी " अरे आली तू बस ना " असं म्हणून तिला बसण्यासाठी खुर्ची पुढे केली. नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त केस मस्त जॅकेट अश्या अवतारात तो आला होता hii heloo या फॉर्मली स्वागता नंतर त्यांनी कॉफी ऑर्डर केली. इथली कॉफी आज सुद्धा तशीच आहे अगदी कबीरच्या स्वभावासारखीच. कबीर फार काही बदलला नव्हता कॉफी येई पर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा हे चालू होतं. एकदाची दोघांची " खास " आवडती कॉफी आली. कॉफीचा पहिला सिप घेऊन इथली कॉफी अगदी तशीच आहे ना गं ! असं कबीर म्हणून गेला. कॉफीच्या सोबतीने गप्पा रंगत गेल्या , जुन्या आठवणी , जुने किस्से कॉफीचा माहोल सगळं किती आधी सारखं आहे असं अनया ला वाटून गेलं. आता कुठे गप्पा रंगल्या असताना दोघे कुठेतरी टॉक्सिक गप्पा मारत मारत लग्न वैगरे या विषयावर येऊन पोहचले. अनया ने ती live in मध्ये राहते असं मनमोकळे पणे सांगून टाकलं ! कबीर अजूनही लाइफ पार्टनर च्या शोधात असल्याचं सांगत होता. गप्पाच्या नादात कॉफी संपली आणि कबीर ने आपण एवढ्या वर्षाने का भेटलोय याचं कारण सांगायला सुरुवात केली. कबीर हा देश सोडून इथली लोक सोडून काही काळा पुरता परदेशी जाणार होता पण अनया ला जाताना या वेळी तरी फुरसत मध्ये टाटा बाय बाय करून जावं म्हणून आज निवांत भेटला होता. काहीतरी कामा निमित्त तो परदेशात जाणार होता , जाण्याआधी इथल्या खास व्यक्तीचा खास निरोप घेण्याससाठी आजच्या कॉफीचा घाट घातलंय गं हे सांगून तो मोकळा झाला. कॉफी , कबीरच्या गप्पा आणि जुन्या आठवणी सर्रकन डोळ्यासमोरून तेच जुने दिवस पटकन येऊन गेले आणि कॉफी संपवून दोघे एकमेकांचा निरोप घेऊन दोन वेगळ्या वाटेवर निघाले .....
Comments
Post a Comment