" चिल्ल बियर ते कडक चहा "
किती गंमत असते ना काही नात्यामध्ये त्यात जर तुमचं नात हे अनपेक्षित पणे घडलं असेन किंवा एखादी व्यक्ती आयुष्यात अनपेक्षित पणे येते आणि पुढे आयुष्यभरासाठी आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा एक भाग होऊन जाते. निशांत हा इन्स्टाग्राम वर भेटला असला तरी आज सुद्धा तिला हे ठळक आठवतंय की तिच्या २१ व्या वाढदिवसाला मॅडम बार मध्ये एकट्या birthday सेलिब्रेशन करत असताना व्हर्च्युअली तो तिच्या त्या खास दिवसाचा एक भाग होता आणि नेमकं त्याचं दिवशी यांचे नंबर exchnage झाले! किती योगायोग असावा ना इथून यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. असं म्हणतात जी लोक आपल्याला अनपेक्षित अचानक भेटतात ती फार खास असतात " निशांत " सुद्धा तिच्या साठी तेवढाच खास आहे. डिजिटली गप्पा नंतर त्यांना भेटण्याची एक अनोखी ओढ लागली सगळंच एवढं unexpected घडत असताना त्यांची " पहिली वहिली " भेट देखील तितकीच कमाल होती. त्यांचा ऑफिस खालच्या टपरीवर मस्त चहा घेत पहिल्या भेटीला चियर्स म्हणत त्यांच्या हातातल्या सिगरेट च्या धुरात ती कुठे तरी एवढी रमली की तिला कळलं नाही आपला चहा तर केव्हाच संपला. आजूबाजूला कॅफे नसल्याने ही " टपरी " वरची खास भेट तिच्यासाठी अविस्मरणीय ठरली. पुढे हा गप्पाचा प्रवास सुरु होता , मग रोज गप्पा त्याचं ऑफिस हिचं काम यावरून त्यांच्या आवडीनिवडीच्या गप्पा मधून ते एकमेकांना ओळखू लागले आणि कधी एकमेकांचा कंफर्ट झोन झाले ते त्यांना कळलंच नाही. त्यांच्यात एक गंमत अशी की कधीच हे प्लॅन्स करून भेटायचे नाही sudden प्लॅन्स खूप यशस्वी होतात यावर तिचा ठाम विश्वास होता आणि हे खरं देखील व्हायचं. कधीतरी कॉल्स गप्पा मग वीकेंड ला भेटून मस्त चिल्ल आऊट करणं ड्रिंक सोबत गप्पाची मैफिल रंगवत बँड स्टँड ला बसणं अश्या अनेक भन्नाट आणि तितक्याच भारी गोष्टी त्यांनी आजवर केल्यात. त्यांच्या भेटीत एक अनोखी ओढ असायची अनेक दिवसांनी होणारी भेट दरवेळी काहीतरी नवीन उलगडून जायची , आज सुद्धा त्यांच्या भेटी एवढ्याच casually होतात. भेटून एकमेकांनाची कंपनी सोबत अनुभवणं यातच त्यांचं काय ते सुख होत ! छोट्या छोट्या गोष्टी करून यातून ते आनंद शोधायचे , टपरी वरच्या गप्पा , चहा आणि सिगरेट हे एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे यावर दोघांच एकमत व्हायचं आणि मग या गप्पा रंगत जायचा. दोघे खूप मुक्त आहेत तिला ठाऊक आहे पण याला भविष्यात कोणी तरी लाईफ पार्टनर भेटणार मग हा पण भुर्रकन उडून जाणार पण यार मिहिरा चिल्ल कर आपलं हे नातं खूप खास आहे ते कधीच बदलणार नाही हे त्याचे शब्द आज सुद्धा या घडीला खूप काही सांगून जातात. दोघे त्यांची पर्सनल लाईफ मस्त मेंटेन करतात. त्यांचा ऑफिस पासून त्यांचा पार्टी अश्या कित्येक गोष्टी हिला माहीत असतात , पार्टी वरून घरी जाताना तो घरी जाईपर्यंत त्यांच कॅब लोकेशन हजार वेळा चेक करून तो नीट जातो ना अश्या अनेक खास रात्री तिने निशांत सोबत अनुभवल्या आहेत❤ याच छोट्या छोट्या गोष्टी त्या दोघांच्या या खास नात्याचा बेस्ट पार्ट आहे ♥ दोघे मुक्त आहेत एकमेकांसाठी हवं तेव्हा हक्काने उभे राहणारे आहेत पण या नात्याला कुठलाही " टॅग " असू नये या मताची ती असल्याने आपलं जे नातं आहे ते आपण मस्त एन्जॉय करू असं ती त्याला कायम सांगत आलीये. त्यांच्या या अनोख्या नात्यात कधीच पॉज येणार नाही. कामाच्या व्यापात अडकलेले ते दोघे वीकेंडची आतुरतेने वाट बघतात कधीतरी त्यांच्या ऑफिस खालच्या " टपरी " वर चहा , सिगरेट सोबत गप्पा तर कधी मस्त आवडत्या बार मध्ये whiskey किंवा बिअर सोबत हँग होई पर्यंत च्या गप्पा. दोघांना कॉल्स ची ऍलर्जी आहे तरीपण ये चल आज कॉल वर २ मिनिटं तरी बोलू या असं म्हणून यांच्या गप्पा होतात. दिवस संपताना एकमेकांना ते सो कॉल्ड ' गुड नाईट ' बोलणं यांच्या रुटीन चा एक भाग आहे. दिवसभरात नाही बोललो तरी रात्रीचा हा एक मेसेज दोघांना खूप काही देऊन जातो. त्यांच्या भेटी मधली गंमत काही औरच आहे , अचानक भयानक भेटण्यातली ती मज्जा वेगळी यार. त्या " ये जवानी है दिवानी " मधल्या कबीर आणि अदिती सारखे आहेत ते दोघे एकदम मॅड ! आयुष्यात आपला हा वेडेपणा सहन करायला असा एक हक्काचा मित्र असायला हवा आणि तो निशांत आहे. त्यांच्या साध्या भेटीने सुद्धा दोघे हाय होतात , ये नशा कुछ अलग है बॉस. त्यांच्या ऑफिस नंतर Fuckedup होऊन निशांत बार मध्ये चिल्ल मारतो तेव्हा ये कितवा पॅक चालू आज काय पितोस असे stupid प्रश्न विचारून चल खूप वेळ झाला गप घरी जा इथं पर्यन्त अनेक किस्से यांच्या नात्याचा एक भाग आहेत. शिव्या देऊन एकमेकांशी प्रेमाने बोलणारी ही दोन नग लोकं कशी काय एकमेकांना सहन करतात…

Comments
Post a Comment