बकेटलिस्ट
बकेटलिस्ट
आपल्या प्रत्येकाची अशी एक बकेटलिस्ट नक्कीच असते ही बकेटलिस्ट खूप साऱ्या स्वप्नांनी बहरलेली असते. या बकेटलिस्ट मध्ये खूप स्वप्न , इच्छा असतात किती पूर्ण होतात माहीत नाही पण बकेटलिस्ट मधली प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हावी अशी काही अट नसते. पूर्ण झाली तर उत्तम नाही तर नव्या स्वप्नांनी इच्छानी ही बकेटलिस्ट पुन्हा भरते.आजची बकेटलिस्ट काहीशी खास आहे कारण ही बकेटलिस्ट तिच्या एकटीची नसून तिच्या त्या आवडत्या जवळच्या खास व्यक्तींची अशी या दोघांची एक कॉमन " बकेटलिस्ट " आहे! अरे हो असं कुठे लिहिलंय बकेटलिस्ट एकाच व्यक्तीची असावी काही स्वप्न सोबत पाहिलेली असतात , काही प्लॅन्स हे सोबत करायचे असतात त्या गोष्टी तलं ते थ्रिल त्यांना सोबत अनुभवायचं असतं म्हणून ही एकच पण बेस्ट अशी बकेटलिस्ट ! अनया आणि कबीर यांची ही एक कॉमन बकेटलिस्ट जरी असली तरी दोघांना आयुष्यात खूप वेगळ्या गोष्टी अनुभवायचा आहेत , दोघांची स्वप्न एकमेकांच्या सोबतीने पुर्ण करायची आहेत. मग त्यांच्या या कॉमन बकेटलिस्ट मध्ये खूप गोष्टीचा खजिना आहे , थ्रिल आहे , गंमत आहे अश्या अनेक धम्माल आणि भन्नाट गोष्टीनी काठोकाठ भरलेली स्वप्नांची बकेटलिस्ट आहे. अनया ला त्यांच्या सोबत प्रत्येक ठिकाणी प्रवास करायचा तर कबीर ला त्यांच्या भन्नाट फँटसी पूर्ण करायच्या आहेत. तिला around the world ट्रॅव्हल करायचं तर याला तिच्या सोबत भटक्या सारखं हिंडायचं. त्याला त्यांची स्वप्न पूर्ण करायची तर हिला त्यांच्या स्वप्नातला आनंद अनुभवायचा. अनया ला गोवा फिरायचं तर त्याला तिच्या सोबत बीच वर मस्त दारू प्यायची. दोघे दोन वेगळ्या विचारांची माणसं सोबत येऊन एकचं बकेटलिस्ट प्लॅन करतात तेव्हा काय कल्पक आणि भारी गोष्टी करायला मिळतील ना ! हे दोघे वेडे आहेत त्यांना सोबतीने ही बकेटलिस्ट पूर्ण करायची , एकमेकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी एकमेकांना साथ द्यायची. या बकेटलिस्ट मध्ये फिरण्यापासून ते त्यांचा dream work बद्दल सगळंच आहे. सोबतीने कोणीतरी बकेटलिस्ट सुद्धा प्लॅन करू शकत हे त्यांना आज गवसलंय. त्यांच्या बकेटलिस्ट मध्ये दोघांची ५०-५० पार्टनर शिप आहे. गोवा ट्रिप , ड्रीम वर्क , फॉरेन टूर , फँटसी आणि never ending अशी त्यांची स्वप्नांची बकेटलिस्ट!
Comments
Post a Comment