स्पर्श

    " स्पर्श " या शब्दात किती गंमत आहे ना ! कदाचित लॉकडाऊन मुळे या शब्दांची खरी किंमत  माझ्या सारख्या अनेकांना उमजली असेन. स्पर्श हा वेगवेगळा असतो मग तो कोणीतरी मायने केलेला हळुवार स्पर्श असो किंवा कित्येकदा प्रवासात गर्दीत झालेला कोणीतरी मुद्दाम केलेला  नकोसा असा स्पर्श असो. या शब्दांची व्याख्या परिस्थिती नुसार बदलत जाते. आता लॉकडाऊन आणि या कोरोनाच्या काळात साधं आपल्या जवळच्या व्यक्तीला  देखील स्पर्श करण्याची भीती वाटते कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण मग यात हा " स्पर्श " कुठेतरी हरवत चालला का ! या निमित्ताने का होईना स्पर्शाची किंमत कळली. मी शेवटचं कोणाला घट्ट मिठी मारल्याचं मला आठवत नाही , त्याने तिने शेवटचं कधी किस केलं हे आठवत नाही तर आपल्या त्या जिगरी व्यक्तीने आपल्याला प्रमाने कधी जवळ घेऊन कुरवाळलेल हे आठवत नाही. स्पर्श हा अनेकदा हवाहवासा वाटतो कारण तो आपल्याला हव असतो आपल्याला जशी अन्न वस्त्र निवारा यांची गरज असते तशीच आपल्याला " human touch मानवी स्पर्शाची " गरज असते. ऑफिस मधून  थकून भागून आल्यावर आईने डोक्यावरून फिरवलेला हात असू देत किंवा बायकोनं घरी गेल्या गेल्या त्याला मारलेली घट्ट मिठी असू देत या छोट्याछोट्या स्पर्शातुन किती बरं वाटतं सगळं थकवा एका क्षणात गायब होतो आणि आपण समोरच्यात गुंतून जातो. लॉकडाऊन मुळे हे सगळंच खूप मिसिंग आहे प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्याची ओढ आहे , कोणाला तरी तो सेक्स मधला स्पर्श हवा तर कोणाला तरी त्याने घट्ट मिठीत फक्त तिला घेऊन बसावं एवढचं वाटतंय ! हा human touch खरंच एवढा महत्त्वाचा भाग आहे यांची प्रकर्षाने जाणीव या लॉकडाऊन मुळे झाली.  त्या एका स्पर्शाने समोरच्याला आपलंस करता येत म्हणून कदाचित स्पर्श हा एवढा जवळचा असतो.

Comments