प्रवास
आजच्या भेटी मध्ये त्या फॉर्मल भेटीगाठीचा फील जास्त होता म्हणून कदाचित दोघांनी एकमेकांना फार फॉर्मली चल निघतो असं म्हणून दोघे आपल्या प्रवासाला निघाले.प्रवासाच्या वाटा भिन्न होते. आधी एकमेकांच्या भेटीत गंमत होती , कॉफी नंतर त्या बँडस्टँड वर तासनतास गप्पा रंगायचा. आज फक्त कॉफी घेऊन सो कॉल्ड आयुष्यावर गप्पा मारून दोघे आपल्या वाटेवरून निघाले होते. दोघांनी एकमेकांचा निरोप घेऊन निघाले खरे पण पुन्हा मनात त्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. अरे हा किती बदलला आहे याची किंचित जाणीव झाली , परिस्थिती बदलते तसे आपण सुद्धा काळाच्या प्रवाहात वाहत जातो आणि काळानुसार बदलतो. दोघांच्या मनात पुन्हा त्याच जुने दिवसांनी कॉफीच्या गप्पांनी हँग आऊट करायला सुरुवात केली. अनया आणि कबीर दोघे दोन दिशांना राहायचे त्यामुळे सोबत जाण्याचा काही चान्स नव्हता आणि एवढ्या वर्षांनी भेटून चल मी सोडतो वैगरे अशी मनात कल्पना आली तरी ती कल्पना तिथेच छान दिसते म्हणून दोघे आपल्या दोन दिशांनी निघून गेले. आपली भेट होईन का ? कबीर परदेशांत गेलाच नाही तर ? अश्या अनेक प्रश्नांनी एव्हाना अनयांच्या मनात गर्दी करायला सुरुवात केली होती. मनात असलेल्या असंख्य विचाराच्या नादात मॅडम घरी कधी येऊन पोहचल्या हे कळलंच नाही...
Comments
Post a Comment